Friday 30 December 2011

हिशोब


चला आता वेळ आली आहे निरोप घेण्याची.. अहो तुमचा निरोप नाही तर ह्या सरत्या वर्षाचा . तुमच्या सोबत तर कायम राहायचं आहे.

 एक वर्ष संपल आणि दुसर वर्ष नवीन संधी घेऊन दारात उभ आहे .त्याच स्वागत तर करायला हव पण त्याअगोदर सरत्या वर्षाचा हिशोब एकदा मांडायला हवा.
हिशोब म्हणजे पैशाचा नाही कारण आजवर तो हिशोब कधी जमलाच नाही. गेल्या वर्षात किती कमावलं आणि किती गमावलं , किती सुख उपभोगल आणि किती दुख सहन केल ,किती माणस जोडली आणि किती माणस तुटली , ह्याचा ताळेबंद तर मांडायलाच हवा.

मागे वळून पाहिल तेव्हा हे वर्ष तस सुख देऊनच गेल, वैयक्तिक प्रगतीच झाली  पण काही आशा अजूनही मनात तशाच राहिल्या आहेत. मनाने सुद्धा अनेकदा निराशेचे सूर गायले परंतु सभोवतालच्या माणसांमुळे लढायची जिद्द अजून आहे.

वर्षभरात मनाला आनंद आणि समाधान मिळवून देणाऱ्या गोष्टी घडून आल्या. काही कविता रचल्या गेल्या , चित्रकलेमध्ये पुन्हा एकदा मन रमु लागल ,छायाचित्रणाची गोडी लागली , ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली . नव्याने जोडल्या गेलेल्या मित्र-मंडळीमुळे आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे सर्व काही घडून आल.

हिशोब पहिला तर जमेच्याच बाजू आहेत सगळ्या पण मनात राहिलेल्या अपूर्ण इच्छाच काय करणार ?? हा प्रश्न सारखा मनाला टोचत आहे. निराशा एखाद्या सुनामीसारखी येते आणि क्षणात स्वप्नाचे सारे बंगले पाण्यात उद्धवस्त करून जाते . वर्ष संपल तर ह्या अपूर्ण इच्छा मागे ठेवून पुढे जायचं का?? नाही अस नाही.. तर पुढल्या वर्षात पूर्ण करण्यासाठी त्यांना पण सोबत घेऊन जायच. जगण्याची लढाई अशीच चालू ठेवायची आहे.

वर्षभरात तुम्ही जो काही प्रतिसाद दिला आणि मार्गदर्शन केल त्याबद्धल मी तुमचे आभार मानतो आणि पुढील वर्ष तुम्हा सर्वाना सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Thursday 22 December 2011

आयुष्याची समीकरणे


सोडवत आहे एकरेषीय समीकरणे
प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष
स्थापिला बिंदू स्वःतचा
सोबतिला जरी असतिल अनेक

                                         बिंदूमधील अंतरे नात्याची
                                         काही जवळ तर काही दूरची
                                         निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे
                                         सुखदु:खाच्या अक्षांना छेदती

गवसतील तेव्हा रेषांना
कधी कोन काटकोन त्रिकोण
आणि बदलून जाईल नशीब
मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन

                                        बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
                                        कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
                                       असेच करता करता सुटतील समीकरणे
                                       उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती...

यशवंत....

Wednesday 19 October 2011

चुकीचे हिशेब

मी मांडले हिशेब नेहमी
ते सारे चुकीचे होते

ढाळले अश्रु ज्यांसमोर
त्यांना हे नेहमीचे होते

सोसले घाव सारे ते तर
माझ्या ओळखीचे होते

ना कळले सागर जे
तळ तयांचे खोलीचे होते

आर्त स्वर माझे हे
कधीतरी तुझ्या अंगणीचे होते

दुख कधी ना कळले कुणाला
कारण सारे हे माझ्या मनीचे होते

यशवंत 

Monday 29 August 2011

एक स्वप्न आहे


 एक स्वप्न आहे
तुला
खळखळून हसताना पाहणार
तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रू
बनून गालावर वाहणार

एक स्वप्न आहे
तुला हळुवार कवेत घेणार
सोबतीने तुझ्या मला
प्रीतीत चिंब भिजवणार

एक स्वप्न आहे
तुझ्या भविष्यात हरवणार
तू दूर असताना मात्र 
आयुष्य शून्य जाणवणार 


एक स्वप्न आहे
तूच सार जीवन बनून
संगतीने तुझ्या जगणार

तुझ्याच डोळ्यांनी स्वप्न पाहणारं 
एक स्वप्न आहे ......

यशवंत
 

Tuesday 9 August 2011

आपण

एकमेकांचा निरोप घेताना लपवले ते भाव आपण
दूर जाताना पुन्हा एकदा जवळ आलो तेच  आपण

दाटले मनी जरी गालांवर ना ओघळले
आसवांमध्ये भिजून झालो चिंब ते आपण

आठवणीना दूर लोटुनी पाहतोय भविष्याची स्वप्न
तरीही भूतकाळामध्ये रेगांळूनी अडकलो ते आपण

उष्ण श्वासांनी भरलेले कुठे गेले सारे ते क्षण 
गुंतलेल्या श्वासांमधुनी वेगळे झालो ते आपण

वेगळ्या वाटांनी  जरी आज चालतोय हे जीवन
हरवलं  ते नात शोधतोय तेच ते आपण  
 
यशवंत 

Tuesday 26 July 2011

तू

तळपत्या आयुष्यात तुझीच रे कमी होती
चातकाप्रमाने मी तुझीच वाट पहिली होती

कस रे तुला सांगू कस समझाऊ
तुझ्याविना मनाची काहिली झाली होती

तू काही क्षणापुरता येउन गेलास पण
चिंब भिजायची  इच्छा अपुरी राहिली होती

मागे  उरली रिती ओंजळ अन
स्वप्ने सुद्धा अश्रुंमध्ये वाहिली होती

यशवंत

Monday 25 July 2011

अनमोल प्रीत

सोडू नकोस साथ
जर मांडलास डाव
कवडीमोल जीनं तुझ्याविना
नसे काही भाव

प्रीतीची फुले आता
मनी पुन्हा जपलीत
सुखाची स्वप्ने सारी
भविष्यामध्ये लपलीत

जखमांवर तुझी फुंकर
ना वेदनेची बात
साथ जरी दिली आता
नको सोडूस हा हात

सैरभैर झालेल्या वाटांवर
गवसलं हे अतुट नातं
तुझी माझी अनमोल प्रीत
अन प्रीतीत बहरलेली हरं एक रात

यशवंत

Wednesday 11 May 2011

भूतकाळ

भूतकाळाला कितीही विसरा
तो तुमच्या समोर येणार
आठवणीना कितीही मागे ठेवा
त्या तुम्हाला भूतकाळात नेणार

यशवंत

Saturday 30 April 2011

माझी पिल्लं


वाचन,लेखन ,कॉम्पुटर ह्याशिवाय माझ्या लाइफमध्ये महत्वाच आहे ते म्हणजे माझे मासे....
ज्यांना मी जीवापाड जपतो खास करून discus मासा सगळ्या मासाचा राजाच असेल अस बोला हवा तर
अरे हो discus म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल ना ??? मी आहे ना मग सांगायला ...Discus एक माशांची जात आहे जी दिसायला खूप सुंदर असते वेगवेगळे रंग त्या रंगाच्या designs पाहू मन अगदी हरखून जात

तसे मासे पाळायची आवड मला लहानपणापासूनच तेव्हा एक एक मासे आणून मी बाटली मध्ये ठेवायचो पण fishtank घ्याच मनात नेहमी होत आणि मुहूर्त भेटला तोः म्हणजे दहावीचा निकाल लागल्यावरच ...
शिष्यवृतीचे थोडे फार पैसे जमवून मी माझा पहिला secondhand fishtank विकत घेतला तेव्हा  साधे मासे आणायचो जे माझ्या खिशाला परवडतील असेच...
मनात मात्र तेव्हा discus मासा घ्यायची इच्चा भरपूर होती पण त्यासाठी मला वर्षभर पोकेत्मोनेय पैसे साठवावे लागले असते म्हणून म्हटलं नको राहू देत. जेव्हा एखादी गोष्ट मनात असताना मिळत नाही ना तेव्हा त्याबद्दलच आकर्षण अजून वाढत जात तसच माझ ह्या बाबतीत झाल ... जेव्हा जॉबला  लागलो तेव्हा मात्र मी हा  मासा  विकत घेण्याच धाडस केल..

धाडसच म्हणावं लागेल कारण हा मासा जितका सुंदर दिसतो तितकाच नाजूक आहे. discus साठी tank च तापमान सांभाळाव लागत ,पाणी स्वचछ हव , खूप काही होत आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये fail झालो . मी घेतलेले चार मासे दोन दिवसामध्ये मेले [:(] . घरातल्याच्या खूप शिव्या खाव्या लागल्या [:(]. पण पुन्हा मागच्या वर्षी मी discus सांभाळायचे ह्या जिद्दीने उठलो आणि चार discus मासे विकत आणले आणि दोन महिन्यानंतर हे चार मासे सेट झाल्यानंतर अजून एक जोडी आणली .आज गेले सहा-सात महिने झाले हे मासे माझ्याजवळ मस्त मोठे झालेत माझ्या ओर्कुट वर profile वर ह्यातल्या एका मासाचा फोटो टाकला तेव्हा अनेक परदेशी लोकांनी माझ्या जवळ अशा माशाची पिल असतील तर आम्हाला पाठवून दे अशी मागणी केली. (त्याच सहा माशांचे फोटो इकडे देत आहे )त्या पिल्लांचे पैसे द्यायला ते तयार होते पण माझ्याजवळ इन मीन सहाच मासे मी कुठून देणार त्यांना पिल्लं





मग असाच मनात विचार आला कि का नाही ह्या माशांची पिल्लं आणून मोठ करूयात आणि विकुयात पण तेवढ धाडस होत नव्हत ... पण त्यादिवशी अचानक माझे ओर्कुट वरचे फोटो पाहून माझा एक शालेय जीवनातला राहुल नावच मित्राने call केला. तेव्हा राहुलला पण ह्याची आवड आहे समझल मग काय आम्ही दोघे जनांनी आमचा business चालू करायचं ठरवलं.छोटा का होईना पण business चालू करायचा अस ठरलं आमच .ह्या सगळ्यामध्ये राहुलचा अजून एक मित्र रोहन भेटला आणि आमची टीम तयार झाली .

त्यांनतर काही दिवस आमचे मोठे fishtank बनवण्यामध्ये गेले आणि आणि मुंबई मध्ये माशाची पिल्लं शोधण्यात गेली. एका आठवड्यानंतर आम्हाल मुलुंड मध्ये बालकृष्ण प्रभू नावाचा मुलगा भेटला जो आमच्या पेक्षाही ह्या माशा साठी वेडा होता. सुदैवाने  त्याच्याकडे १०० पिल्लं होती जी आम्ही विकत घेतली.आणि मग आमच ठरलं कि राहुल ४० पिल्लं ,रोहन २0  पिल्लं आणि मी ४० पिल्लं सांभाळणार.




आज जवळ जवळ दोन आठवडे होत आले आहेत पिल्लं अजून लहान आहेत.ऑफिसवरून आल्यावर  वेळच्या वेळी खायला देणे त्यांचा पाणी बदलन हे सगळ करता करत दिवस कधी संपून जातो कळतही नाही. खूप जपाव लागत आहे ह्या पिल्लांना आता थोडी आजारी पडली आहेत तर मग औषध देऊन treatment करावी लागत आहे. सार काही मी करत आहे का मला नाही माहित business  असला तरी एक वेगळीच नशा ह्या सगळ्याची. हि सगळी पिल व्यवस्तीत मोठी होऊ देत एवढंच वाटत आहे. कुठे तरी मनात प्रश्न आहे कि मी business म्हणून करत आहे का हे सार कि माझ्या पिल्लांना मोठ करत???
 प्रश्नाच उत्तर सापडायला काही काळ जावा लागेल.....



Friday 29 April 2011

मनापासून कवटाळले

आम्ही मनापासून कवटाळले
आमचे ते मरण
इथे तर कुणी नव्हते
पण वाट पाहत होते सरण

यशवंत

प्रेमाचा झुला

तू सोडून गेलीस
तर जीवन एकाकी आहे
तूच सांग मला
तुझ्याशिवाय जीवन काय बाकी आहे

तुला कसं वाटल  की
मी तुझ्यावाचून जगेन
तुझी सोबत नसताना
कशी भविष्याची स्वप्न बघेन



दुनियेला नाही समझली
तगमग आपल्या मनाची
तुला तर कल्पना होती
आपण पाहिलेल्या स्वप्नांची

तू परत मागे वळ
आयुष्य पुन्हा बहरेल
तू पुन्हा साथ दे
हे दुःख  क्षणात सरेल

शपथ आपल्या प्रेमाची
मी देत आहे तुला
ह्या मनातल्या प्रेमाचा
परत एकदा झुलव तू झुला


यशवंत

Wednesday 27 April 2011

पामर किनारा

वादळ आले आणि निघून गेले
उरल्या फक्त त्याच्या क्रूर पाऊलखुणा
सागरही आता बऱ्यापैकी स्थिरावरला
उधवस्त झाला फक्त पामर किनारा

यशवंत

कवितेच्या जगात

कवितेच्या जगात शब्द पोरके नसतात
त्यांना कुणीतरी   एक वेडा भेटतो
जवळ घेतो प्रेम करतो
कधी कधी तर त्यांचाशीच भांडतो

हे शब्द  वेड्यावर  रुसतात
त्याच्यापासून दूर निघून जातात
तो हिरमुसला कि मग
त्याच्यावरच खट्याळ पणे हसतात

कधी त्याच्या प्रेयसीचे टपोरे डोळे होतात
कधी अश्रू बनून गालावर ओघळतात
मायेची सावली बनतात
शब्दच सारे आयुष्य बनून जगतात

त्या वेड्या वर मनापासून प्रेम करतात
सुख दुखात साथ जीवनभर साथ देतात
त्या वेड्याशी एकरूप होऊन जातात
तेव्हाच शब्दरुपी कविता सुचतात

यशवंत

नकोच ते जीने

वादळापरी  तुझे माझ्या जन्मी येणे
उधवस्त ते किनारे तुझे फिरुनी जाने

का भावनांचा खेळ मांडशी  नव्याने
घाव सोसले सारे वेड्या त्या पारव्याने

नको आता पुन्हा अश्रुंचे ते वाहणे
मृगजळामध्ये सुखाचे कवडसे पाहणे

सरणावरी आता किती वाट पाहणे
मृत्यूच बरा हा नकोच ते जीने

यशवंत